लातूर,(जिमाका):-जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय व्यवस्थेत Dedicated Covid Hospatil (DCH), Dedicated Covid Health Canter (DCHC), Covid Care Canter (CCC), इ. स्थापन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात सुद्धा कोव्हीड आजारावर उपचार सुरू आहेत. कोव्हीड-19 बाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळविण्यासाठी आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्णालयात कोव्हीड रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी शासन नियमाप्रमाणे दर आकारने, आधिसूचित निश्चित केलेले दर दर्शनी भागावर लावणे, देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणी करणे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व खासगी रुग्णालयांत दाखल होणार असून या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे, रुग्णांच्या अडचणी, त्यांच्या शंकेचे निराकरण करणे इ. बाबींचे सनियंत्रण करण्यासाठी खाजगी कोव्हीड रुग्णालयात नोडल अधिकारी आणि लेखाधिकारी यांची नियुक्ती करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात कोव्हीड रुग्णावर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी शासन नियमाप्रमाणे दर आकारने, अधिसूचित निश्चित केलेले दर दर्शनी भागावर लावणे, देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणी करणे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे, रुग्णांच्या अडचणी, त्यांच्या शंकेचे निराकरण करणे इ. बाबींचे संनियंत्रण करण्यासाठी खाजगी कोव्हीड रुग्णालयात पुढील प्रमाणे नोडल अधिकारी आणि लेखाधिकारी यांची नियुक्ती करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
डीसीएचसी, आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, बार्शी रोड, लातूर चे श्री.एम.एम.कुलकर्णी, जिल्हा परिषद लातूर, मो.क्र.9421485230 श्री.एस.जी. पवार, सहाय्यक लेखाधिकारी लातूर, मो.क्र.9420964860,डीसीएचसी, सहयाद्री ॲक्सीडेंड ॲन्ड न्युरोकेअर सेंटर, बांधकाम भवन लातूर, श्री.उमेश पवार, सहायक रजिस्टार डिडीआर ऑफीस लातूर, मो.क्र.9822112114, डी.के.राऊत, सहायक लेखाधिकारी, लातूर, मो.क्र.7776812669, डीसीएचसी-माऊली हॉस्पीटल ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटर,औसा रोड, लातूर,श्री.बी.डी. दुधभाते, जिल्हा डेअरी ऑफीसर, लातूर, मो.क्र.9421672364, श्री.आर.टी.घोलप, सहायक लेखाधिकारी लातूर, मो.क्र.9420873459, डीसीएचसी- डॉ.मोरे हायपर टेंशन क्लीनिक ॲन्ड स्पेशालिटी हॉस्पीटल, मुरुड, जि.लातूर श्री.बी.एम.बंडगर, मुरुड आय.सी.डी.एस. प्रकल्प मो.क्र.8625820504, श्री.एम.एस.मुनाळे लोकलफंड, लातूर, मो.क्र.9423718060, डीसीएच- लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, श्री.के.व्ही.काळे जिल्हा परिषद लातूर, मो.क्र.8208518404, बी.व्ही.सुर्यवंशी सहायक लेखाधिकारी लातूर मो.क्र.9423143512.
उपरोक्त नियुक्त नोडल अधिकारी आणि लेखाधिकारी यांनी खाजगी रुग्णालयात कोव्हीड रुग्णावर करण्यात येणाऱ्या उपचारासाठी शासन नियमाप्रमाणे दर आकारने, अधिसूचित दर दर्शनी भागावर लावणे, देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणी करणे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे. रुग्णांच्या अडचणी, शंकांचे निराकरण करणे. इ. खाजगी रुग्णालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचारासाठी दर आकारले जातात किंवा कसे याचे लेखापरिक्षण करणे इ. कामकाज करावे. या कामासाठी आपल्या अधिनस्त कर्मचारी, संसाधनांचा यथोचित वापर करण्यात यावा.
जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, लातूर यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना मिळावा यासाठी विशेष लक्ष द्यावे. तसेच खासगी रुग्णालय आणि उपरोक्त नियुक्त नोडल अधिकारी व लेखाधिकारी यांच्याशी समन्वय साधून यासंदर्भात कामकाज करावे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड- 19 उपायोजना नियम, 20 20 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.