लातूर,(जिमाका):-औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ औरंगाबाद अंतर्गत अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथील 156 सदनिका सोडतीचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृहात शासनाच्या (कोव्हीड-19) च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन उपविभागीय अधिकारी सुनील यादव, मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवाड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाच्या प्रधानमंत्री अवास योजना सदनिका सोडत कार्यक्रमास तहसिलदार स्वपनील पवार, समाज कल्याण विभागाचे बी.एम.केंद्रे, जिल्हा माहिती कार्यालयाचे ए.एन.सोनवणे, मिळकत व्यवस्थापक एस.एल.गायकवाड, सदनिका लाभार्थी उपस्थित होते.
प्लाट नं.आर-1 अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथील 736 सदनिका अत्यल्प उत्पन्न गट या योजनेस अनुसरुन एकूण 247 सदनिकाची जाहिरात 8 जानेवारी 2020 रोजी वृत्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर योजनेच्या अनुसरुन सदनिकेचे आरक्षण विवरण,उपलब्ध् सदनिका,एकूण प्राप्त अर्ज पुढील प्रमाणे आहेत. माजी सैनिक उपलब्ध् सदनिका - 31, एकूण अर्ज प्राप्त-1, राज्य शासकीय कर्मचारी उपलब्ध् सदनिका - 16 एकूण अर्ज प्राप्त-1, अनुसूचित जमाती (एस.टी.) उपलब्ध् सदनिका-24 एकूण अर्ज प्राप्त-2, भटक्या जमाती (एन.टी.) उपलब्ध् सदनिका -5 एकूण अर्ज प्राप्त-4, अंध व अपंग एकूण सदनिका -12 एकूण अर्ज प्राप्त-7,अनुसूचित जाती (एस.सी.) उपलब्ध् सदनिका-9 एकूण अर्ज प्राप्त-11, सर्वसाधारण जनता उपलब्ध् सदनिका -59, एकूण प्राप्त-94 अर्ज प्राप्त झाले होते.
यावेळी उपलब्ध् सदनिकेची सोडत पूर्ण करण्यात आली असून अनूसूचित जातीमधील 2 लाभार्थी व सर्वसाधारण यादीतील 35 लाभार्थी प्रतिक्षा यादीमध्ये आले आहेत. एकूण 156 लाभार्थ्यांना या सदनिकेचा सोडतीव्दारे लाभ मिळाला आहे.
या सदनिका सोडत कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाखा अभियंता रमेश बिराजदार यांनी सविस्तरपणे विशद केले.कार्यक्रमास उपअभियंता एस.एम.अडकले, मुख्यभाडे वसुलीकर रमेश बरफे, भाडे वसूलीकर महेश वैकुंठे, संतोष दुडकीकर,श्रीकांत बाबळसुरे, पी.एन.शेख उपिस्थत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोव्हीड-19 च्या सुचने प्रमाणे सभागृहाचे पूर्ण सॅनिटायझर करण्यात येऊन भौतिक अंतराचे पालन करुनच सदनिका सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.